महाराष्ट्र

मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पंढरपूर ( प्रतिनिधी ) : राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा, अशा शुभेच्छापर आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री .श्री.उद्धवजी ठाकरे यांनी आज येथे केले.

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे  यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेची चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी सौ.रश्मीताई ठाकरे, युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री श्री. आदित्यजी ठाकरे,  शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी,  समिती सदस्य श्री.संभाजी राजे शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री. ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की,  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी आम्ही डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिका आमच्या ताब्यात मिळत असल्याने आमचा आनंद द्विगुणित होत आहे. सदर रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना मोठा आधार ठरेल, असा विश्वास श्री.औसेकर महाराज यांनी व्यक्त केला. तर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी रुग्णवाहिका भेट दिल्याबद्दल डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांचे आभार मानले. 

यावेळी, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रति मुख्यमंत्री महोदय यांच्यासहित उपस्थित सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.समस्त महाराष्ट्रीय लोकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची कोरोना महामारीतून मुक्तता करा ,अशी भगवान श्री विठ्ठलाला आपण सर्वजण साकडे घालूया. 

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!