ठाणे

दंत आरोग्याबाबत महिला जागरूक…- दंत चिकित्सक डॉ.उत्कर्षा कांबळे

डोंबिवली ( शंकर जाधव ) : पुरुषांपेक्षा दातांची काळजी आणि निगा स्त्रियांकडून राखली जाते. पुरुषांच्या तुलनेत मौखिक सौंदर्यासोबत स्त्रिया दंत आरोग्याबाबत नेहमी जागरूक असतात असे डोंबिवलीतील दंत चिकित्सक डॉ.उत्कर्षा कांबळे यांनी डोंबिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दंत चिकित्सा शिबिरात आपले मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्थमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दंतचिकित्सा शिबीर आयोजित केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष सुरेश जोशी, कार्याध्यक्ष नंदकुमार धुळे, पांडुरंग चव्हाण, अॅॅड. ब्रम्हा माळी, रमेश दिनकर, जनार्दन भोईर,राहुल चौधरी, मिलिंद भालेराव, विजय जोशी, भरत गायकवाड, उदय शेट्टी, प्रसन्न अचलकर, समीर गुधाटे,समीर भोईर,जगदीश ठाकूर, राजेंद्र नांदोस्कर, निरंजन भोसले,महिला शहर अध्यक्षा संगीता मोरे, युवक अध्यक्ष प्रसाद गायकवाड,उपस्थित होते.यावेळी डॉ. उत्कर्षा कांबळे पुढे म्हणाल्या, पुरुषांमध्ये गुटका, पान-सुपारी खाण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्या दातांचे आरोग्य बिघडते. दातांचे दुखणे सुरू होऊन ते माहित पडेपर्यंत अनेक वर्षांचा कालावधी लागतो म्हणून दातांची चिकित्सा वेळोवेळी करावी. मुलांनी फास्टफूड घेतल्यावर दातांची निगा राखावी.तर कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील म्हणाले, महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न असेल. युती आघाडी अजून नक्की नाही.आमचे नेते याबाबत विचार करतील आणि त्यांचा जो निर्णय असेल त्याप्रमाणे होईल. शहरातील विकासकामे झाली नसल्याचा आरोप करून पुलाची कामे रखडली आहेत. डोंबिवली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष सुरेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली आता जुने लोक राष्ट्रवादीत जोडले गेले आहेत त्यामुळे डोंबिवलीत राष्ट्रवादीला चांगले दिवस नक्की येणार असा विश्वास आहे.

कमी मतदानाचा फटका शिवसेना आणि भाजपला बसण्याची शक्यता

मतदान यादीत फोटो नसल्याने १ लाख डोंबिवलीकर मतदानापासून वंचित राहतील.याचा फटका भाजप आणि शिवसेनेला बसल्याची शक्यता आहे.डोंबिवलीत ३५ ते ४० टक्के मतदान होत असते.गेली तीन टर्म डोंबिवलीत भाजपचा आमदार आणि कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार निवडून येतात.मात्र मतदानाचा टक्का कमी झाल्यास याचा फटका या दोन्ही पक्षांना बसणार आहे. परंतु याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला होईल असा विश्वास कार्याध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दाखविला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!