महाराष्ट्र

अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद

• आवेदन पत्र भरण्यास विद्यार्थांना पुरेसा कालावधी देणार

मुंबई, दि. २२ : सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा असणारे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. ही सुविधा पूर्ववत सुरु झाल्यानंतर संबंधिताना अवगत करण्यात येईल. तसेच परिक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माधमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

सन 2021-22 च्या इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. 21 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत करण्यात आले आहे. परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.20 जुलै 2021 रोजी सकाळी 11.30 पासून दि. 26 जुलै 2021 अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!