ठाणे / दिवा : दिव्यात सिद्धांत पार्क मधील श्री वक्रतुंड को. ऑप. सोसायटीच्या मार्लेश्वर पतपेढीच्या कार्यालयाच्या खालील संपूर्ण स्लॅब सहीत पडून दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी तर एक महिला किरकोळ जखमी आहेत. त्यावेळी पोलीस, महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
श्री वक्रतुंड को. ऑप. सोसायटी, सिध्दांत पार्क, साबेगाव दिवा पूर्व येथील रूम नं.06 रूमच्या वरती मार्लेश्वर नागरी पतसंस्था मधील काम करीत असलेल्या दोन महिला कर्मचारी या रूम न 06 मध्ये स्लॅब सह पडून जखमी झालेल्या आहेत. जखमींची नावे अर्पिता 1) आशिष साठम, वय 37 2) सिद्धी गणेश पडवेकर वय 37 दुर्घटनाग्रस्त इमारत/ चाळ 1+ 1 बांधकाम स्वरुपाची 20 वर्ष जुनी आहे. वरील दोन्ही जखमीवर दिवा पूर्व येथील आस्था हाॅस्पीटल मध्ये उपचार चालू आहे. त्या इमारती मधील 18 कुटुंबांना दुसऱ्या जागी हलवले असून ती धोकादायक म्हणून पालिकेने सिल केली आहे.