मुंबई

इमारतीची लिफ्ट कोसळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू.

 मुंबई ता २४ जुलै, ( संतोष पडवळ) : मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली.अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग 118 आणि 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही 6 जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम हॉस्पिटल आणि नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून 4 जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. 6 जण आत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!