डोंबिवली ( शंकर जाधव ) : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली येथील डॉक्टर विनय कुमार सचान यांच्या स्मारकाचा जवळ पुष्प अर्पण करून शहिदांना मानवंदना देण्यात आली.
२६ जुलै १९९९ हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला धुळीस मिळवून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा धुव्वा उडवला याचा सार्थ अभिमान सर्व भारतीयांना आहे.तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आपल्या सरकारने पाकिस्तान सरकारला मान खाली घालण्यास भाग पाडले. त्या कारगिल युद्धामध्ये आपले बरेच जवान शहीद झाले. परंतु एक इंच ही मागे न हटता पाकिस्तानला आणि पाकिस्तानी घुसखोरांना यमसदनी धाडून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले. त्या सर्व आपल्या देशातील शहिदांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, पुनम पाटील, मनिषा केळकर,माजी नगरसेवक राहुल दामले, विशू पेडणेकर,निलेश म्हात्रे, विनोद काळण, संदीप पुराणिक, प्रमिला चौधरी,पदाधिकारी संजू बिडवाडकर , संजय कुलकर्णी, सुरेश पुराणिक, युवा मोर्चाचे अध्यक्ष मितेश पेणकर यासहअनेक कार्यकर्ते उपस्थित होते.