ठाणे

२७ गावातील जनतेला केडीएमसीच्या जोखडातून मुक्त करा..राष्ट्रवादीच्या बैठकीत मागणी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : १ जून २०१५ रोजी २७ गावे कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली.गावातील जनता शासनाच्या या  निर्णयावर खुश नसून पायाभूत सुविधांचा आभाव असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीने २७ गावतील जनतेसाठी ठोस पाउले उचलून केडीएमसीच्या जोखडातून मुक्त करा अशी मागणी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा येथे समाज मंदिर सभागृहात पक्षाच्या कल्याण ग्रामीणच्या बैठकित करण्यात आली.

  या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रंगनाथ ठाकुर,भगवान पाटील, बाळाराम ठाकुर, प्रल्हाद भोईर, तुकाराम केणे, विश्वनाथ रसाळ, अभिमन्यू म्हात्रे, वासुदेव संते, सुमीत सोनके,ज्ञानेश्वर माळी, हरीचंद्र देसले, बाळकृष्ण कापडी, बाळकृष्ण जोशी, तेजस पाटील, अॅड. ब्रम्हा माळी,अॅड. प्रल्हाद भिलारे  पांडुरंग वालिलकर, संदिप पालकरी, सदाशिव भोईर, करसन  पाटील, अनंता पाटील, तकदिर भोईर, भास्कर वझे, राम काळण, समीर दुधाटे,निरंजन भोसले, राजेश खुटवड, नासिर शेख,श्रीरंग भोसले, विद्याधर राणे, आकाश संते,भीमराव पाटील, श्रीकांत म्हात्रे, महिला अध्यक्षा उज्वलाताई भोसले, सुरैया पटेल,विनया पाटील, शबनम खान,सपना धनगर,माया गुरव,पुजा करपे,पुष्पा उज्जनवाल, ज्योती पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.कल्याण डोंबिवली जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करणे कामी आणि येणार्या कडोंमपा निवडणूकीला समर्थ पणे सामोरे जाण्याची तयारी करणे कामी खासकरून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

ह्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादीचे कल्याण  जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ( अप्पा) शिंदे यांनी  कल्याण डोंबिवलीत  पक्षिय बलाबल काय आहे आणि निवडणूकीला सामोरे जाताना आपल्या राष्ट्रवादी पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात कशी वाढवता येईल ह्या विषयी जिल्हाध्यक्षांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर अर्जुनबुवा चौधरी आणि गुलाबराव वझे ह्यांनी कल्याण ग्रामीण मधील २७ गावे आणि येथील पायाभूत सुविधांचा बोजवारा ह्याचे यथार्थ वर्णन करून त्याकडे जिल्हाध्यक्षांचे लक्ष वेधले. आघाडी सरकारकडे २७ गावांची हि व्यथा सादर करून २७ गावातील जनतेला कडोंमपाच्या जोखडातून मुक्तता करणेकामी तजविज करावी. अशी त्यांना विनंती केली. ह्या प्रसंगी जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील ह्यांनीही कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करणे कामी विशेष मार्गदर्शन केले. 

सदर बैठकीत सरचिटणीस गजानन मांगरुळकर यांनी प्रास्ताविक सादर केले तर कल्याण ग्रामीणचा एकुणच कार्य अहवाल अध्यक्ष दत्तात्रय वझे यांनी मान्यवरांना समोर सादर केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!