डोंबिवली ( शंकर जाधव ) : शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.मात्र त्यामुळे मुलांमध्ये मोबाईलचा वापर वाढला आहे.स्क्रीनटाईमला लिमिट नसल्याने याचा दुष्परिणाम मुलांच्या डोळ्यावर दिसून येत आहे.हि समस्या गंभीर असून याकडे पालकवर्गानी कानाडोळा केला करू नये.`तुमच्या मुलांना दिवसातून दोन ते तीन तासच मोबाईल वापरू द्या,असे सल्ला वेध आय हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ.हरीश पाठक यांनी डोंबिवलीत दिला.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना विभागीय कार्यालय आणि वेध आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे,नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, राजेश कदम, विधानसभा क्षेत्र संघटक तात्या माने,उपशहरप्रमुख अभिजित ठरवलं,माजी नगरसेविका सारिका चव्हाण,कार्यालय प्रमुख दशरथ चव्हाण, शिवाजी सांगळे, शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील, उपविभाग प्रमुख आत्माराम सावंत, मंगेश मोरे, तानाजी माहांगरे, शाखाप्रमुख प्रशांत खामकर, संजय मांजरेकर,आमोद वैद्य,लक्ष्मीकांत अंबरकर,उपशाखाप्रमुख संतनु कुलकर्णी, महिला विभाग संघटक शिरोडकर,उपविभाग संघटक भारती कदम,शाखा संघटक साधना माळवी,उपविभाग अधिकारी आकाश पांडे आदि उपस्थित होते.या शिबिरात अनेक नागरिकांनी डोळे तपासून घेतले.यावेळी शिवसेना विभागप्रमुख अमोल पाटील म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित डोंबिवलीत विविध ठिकाणी समाजिक उपक्रम आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. त्याच्या एक भाग म्हणून गोग्रासवाडी येथे शिबीर भरविले होते.
तर वेध आय हॉस्पिटल नेत्रतज्ञ डॉ. हरीश पाठक म्हणाले, कोरोना काळात संगणक, लॅपटाॅप वापर वाढला.त्यामुळे डोळ्यांचे आजार वाढले आहे. लहान मुले मोबाईलचा अतिवापर करत असल्याने त्यांच्या डोळ्यावर ताण,चष्मा नंबर वाढणे, डोळ्यात चुरचूरणे असे दुष्परिणाम दिसत आहेत.ऑनलाईन शिक्षणपद्धतीने घरी शाळा सुरु आहे.परंतु ऑनलाईन शाळा संपल्यावर मुले मोबाईलचा जास्त वापर करत आहे नाही याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.लहान मुलांना दोन ते तीन तास स्क्रीनटाईम दिला पाहिजे, त्यापेक्षा जास्त नको.पालकांनी आपल्या पाल्यासोबत जास्ती जास्त वेळ घालवला पाहिजे.त्याच्याशी संवाद आणि खेळ हे महत्वाचे आहे.करोना संपेपर्यत पालकानी मुलांच्या आरोग्यासोबत डोळ्याकडेहि लक्ष दिले पाहिजे.