ठाणे

महाड-पोलादपूरसाठी ठाणे महापालिकेचा “एक हात मदतीचा” उपक्रम

ठाणे : अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने ”एक हात मदतीचा” हा उपक्रम हाती घेण्यात आला असून ठाणेकरांनी या सामाजिक उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होवून सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे महाड-पोलादपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून त्यांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे, त्या अनुषंगाने तेथील नागरिकांना मदत करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने ‘एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मिनरल वॉटर, कपडे, टॉवेल, खाण्याचे पदार्थ, अन्नधान्य( तांदूळ, खाद्यतेल, मीठ, मिरची इद्यादी), चादर, सतरंजी, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, मेणबत्ती, टॉर्च तसेच लहान मुलांसाठी खाऊ आदीची मदत स्विकारण्यात येत आहे.

”एक हात मदतीचा” या उपक्रमात मदत देण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांनी शाळा क्र.४४, दत्तमंदिर समोर शास्त्री नगर बस स्टॉप, वर्तकनगर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दिपाली पवार यांच्याशी ९१५६८६४०२७, विनोद तमखाने यांच्याशी ८८८८८७६१९४ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच महिला आधार केंद्र जहांगीर हाईट्स तत्वज्ञान विद्यापीठाच्या बाजूला घोडबंदर रोड येथे विजय टेकवाड ८६६८२८ ९५१० विठ्ठल मोरे ९७६३३००६०२ आणि शाळा क्र.६९ कळवा प्रभाग समिती कळवा येथे ठाणे लखन जाधव ८८५०७१९३६१ राजेंद्र मोटे ८४२२९३६१८६ आणि रावसाहेब त्रिभुवन ७७३८०३५३६० यांच्याशी संपर्क साधावा. यासोबतच या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी उप आयुक्त मनीष जोशी ९१६७०४३६०६, उप आयुक्त श्रीमती वर्षा दिक्षित ७३०४६५३२४९ आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर ९७६९००७८७८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!