नवी दिल्ली 27 जुलै : कष्टकरी मच्छीमारांचा डिझेलवरील परतावा अडीचशे कोटी रुपयांहून अधिक रक्कम राज्य शासनाकडे प्रलंबित असून तो निधी तात्काळ मच्छीमारांना वितरीत करावा अशी मागणी केंद्रीय सूक्ष्म, लघु ,उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. मागील दोन वर्षांपासून मासेमारी हंगाम नुकसानीत असून १ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात होणार आहे. परंतु मच्छीमारांकडून वित्तीय सहायता नसल्याकारणाने त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने डिझेलवरील परतावा तात्काळ वितरित करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटील यांनी त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याबद्दल त्यांच्या बंगल्यावर सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते .
या प्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपा मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲड चेतनभाई पाटील, कोळी महासंघाचे उपाध्यक्ष देवानंद भोईर आणि ठाणे रायगड जिल्ह्यातील मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते.