नवी दिल्ली : आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी आणि अशा सर्व भूमिपुत्रांमध्ये वैचारिक श्रीमंती आल्यास सामाजिक आणि राजकीय विकास जलद गतीने होईल असे प्रतिपादन नवनिर्वाचित केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी त्यांच्या मंत्रालयात जाऊन शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला असता ते बोलत होते . पंचायतींना प्रशिक्षित करून विकासाच्या मुख्य स्तोत्रांमधे जोडून घेण्याचे कार्य मी या पुढील काळामध्ये महाराष्ट्र पासून सुरु करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, कोळी समाज नेते देवानंद भोईर , युवा नेते चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते