ठाणे

ईमारत बांधकामामुळे रस्ता जलमय; नागरिक त्रस्त कल्याण डोंबिवली पालिकेचे दुर्लक्ष…

 डोंबिवली ( शंकर जाधव )  :  डोंबिवली पूर्व कडील शनी मंदिराच्या समोरील आनंद केमिकल कंपनीच्या जागेवर महावीर बिल्डर  या बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने ईमारत बांधकाम सुरु आहे. या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम स्थळी पावसाचे साचणारे पाणी निचरा होण्यासाठी (वाहून जाण्यासाठी) शेजारच्या रस्त्यावर सोडले आहे.सध्या पावसाचे दिवस आहेत.त्यामुळे रस्ता वारंवार जलमय होत आहे.रस्त्याच्या कडेला पदपथ नसल्याने आणि रस्ता जलमय होत असल्याने नागरिकांना येथून जाणे येणे मुश्किल होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र कल्याण डोंबिवली   पालिकेने दुर्लक्ष केले आहे.

   आनंद केमिकल हि कंपनी अनेक दिवस  बंद अवस्थेत होती.आता या कंपनीच्या जागेवर इमारती बांधण्यात येत आहे. इमारतीच्या पायाचे आणि काँलमचे  काँक्रीटीकरण करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहेत.या खड्यात पावसाचे आणि खड्ड्यातून येणारे पाणी   पंप लावून उपसा करण्यात येत आहे.मात्र या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधकाम करण्यापूर्वी  बांधकाम व्यावसायिकाने नियोजन न केल्याने   पाणी निचरा होण्यासाठी रस्त्यावर सोडले  जात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पाण्यातून वाट काढत  येथून नागरिकांना येणे जाणे मुश्कील होत आहे. या कंपनीच्या जागेवर अनेक इमारतीचे काम बांधकाम अनेक  दिवस  सुरु असल्याने पाणी रस्त्यावर सोडले जाईल,  त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्याची शक्यता आहे

.  याबाबत कल्याण डोंबिवली  महापालिकेचा अश्या बांधकाम व्यावसायिकांवर कोणताही अंकुश नसल्याचे दिसत असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत.काही दिवसांपूर्वी बांधकाम कंपनीच्या गेटमधून धो धो पाणी पाणी रस्त्यावर सोडले जात होते.परंतु सध्या कंपाऊंडच्या पत्र्याखालून एका बोळातून कुणालाही दिसणार नाही, अश्या पध्दतीने पाणी रस्त्यावर सोडले जात आहे.असे स्थानिक रहिवाश्यांनी निदर्शनास आणले आहे. `मनोज देसले प्रतिष्ठान`च्या वतीने  पालिकेचे `इ` प्रभाग अधिकारी भरत पवार यांना १९ जुलै रोजी याबाबत तक्रार केली असून त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. असे प्रतिष्ठान च्या वतीने सांगण्यात आले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!