डोंबिवली ( शंकर जाधव ) : अतिवृष्टीने वाताहात झालेल्या कोकणातील रत्नागिरीच्या चिपळूण भागात डोंबिवली येथील दृष्टी वेलफेयर असोसिएशनची टीम आपली मदत घेऊन पोहचली आणि तेथील लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला .दृष्टी वेलफेयर असोसिएशनच्या टीमने चिपळूण येथे २६ जुलै रोजी पूरग्रस्त असलेल्या ५०० कुटुंबांपर्यंत संपर्क साधला होता आणि त्यानुसार मदतीसाठी आवाहन केल्यानंतर अनेक स्तरांतून मदतीचा मदतीचा हात मिळाल्यानंतर असोसिएशनने त्यांना मूलभूत गरजा देऊन मदत केली.
या मदतीबरोबरच येत्या आठवड्यात ते स्थानिकांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना . टेलि-कॉलिंग आणि व्हिडिओ मुलाखतीद्वारे संपर्क साधणार आहेत .संस्थेच्या संचालिका सोनाली लाड म्हाणाल्या की, महिला सक्षमीकरणावर प्रामुख्याने काम करणार्या द्रुष्टी वेलफेयर असोसिएशनने या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची आणि त्यांना या काळात अन्न आणि मूलभूत जीवनासाठी मदत करुन त्यांच्याशी लढा देण्यास मदत करण्याची योजना आखली आहे. आम्ही चिपळूणकरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करीत आहोत आणि या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत.मदत करणारे कार्यकर्ते आणि कमी वेळात डोनेशन देणारे, हे महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानते कारण आपल्या समाजात अशी माणसे आहेत जे लोकांना मदत करण्याची भूमिका पार पाडतात. तसेच मदत करण्यासाठी एक भरपूर मोठी रक्कम आमच्या एका डोनरनी आमच्या एका फोन वर डोनेट केली मी त्यांचे ही मनःपुर्वक आभार मानते.” अश्या भावनाही लाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दृष्टी वेलफेयर असोसिएशनला कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांकडून मदतिची गरज असल्याचे समजल्यानंतर असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांमध्ये त्याबद्दलचे नियोजन केले आणि वैयक्तिकरीत्या काही भागांचे सर्वेक्षण केले, ज्यांच्या घरांमध्ये पाणी भरून पूर्णतः नुकसान झाले होते अशी कुटुंब आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी जसे होते तसेच बाहेर पडले, ज्यांनी आपले सर्व कष्टाने उभारलेले गमावले त्यांना आवश्यक ती मदत मिळत कारण ही सगळी माणसे आपले कोलमडलेला संसार आवरण्यात व्यस्त आहेत आणि त्या सर्वांना खरोखर मदतीची गरज म्हणूनच, सर्वेक्षण करून योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहचवण्यात आल्याचे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले. परंतु अद्यापही दुर्घटनाग्रस्त आणि पुराने बाधित झालेल्या ठिकाणी स्थिती अत्यंत वाईट असून केवळ १०% क्षेत्राचे संरक्षण आणि सहाय्य करण्यात आले आहे, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही मदतीचा हात देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांसह जाणार आहोत तसेच अनेक समाजिक संस्थानी आणि दानशूर व्यक्तींनी आपल्या या समाजासाठी मानवतेच्या दृष्टीने मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन दृष्टी वेलफेयर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे .
या मदत कार्यात सागर पवार, सिद्धेश परब, राहुल गायकवाड, विशाल माने, जयेंद्र राजेशिर्के, प्रथमेश कांबळे, सचिन कानसे, प्रकाश पाटील, सनी मस्तूद, सागर रायपुरे, निखिल घाग , शशिकांत वाजे ,संगमेश्वर तालुका सांगवे गाव चे सरपंच – देवदत्त शेलार, प्रणय शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .