आरोग्यदूत मुंबई

ऑराबीट हे कोव्हिड (SARS-COV-2) डिसइन्फेक्शनसाठीचे USFDA प्रमाणित अँटि-कोविड क्लास 2 मेडिकल डिव्हाइस भारतात दाखल

मुंबई, 10 ऑगस्ट 2021: ऑराबीट हे SARS-COV-2 डिसइन्फेक्शनसाठीचे USFDA प्रमाणित अँटि-कोविड क्लास 2 मेडिकल डिव्हाइस आज भारतात दाखल करण्यात आले. हाँगकाँगमधील ऑराबीटने साधारण दशकभर एअर फिल्टरेशन क्षेत्रामध्ये सखोल संशोधन केल्यानंतर पेटंटेड AG+ फाइव्ह-स्टेज स्टरलायझेशन प्युरिफाइंग तंत्रज्ञान विकसित केले आहे. ऑराबीटचा AG+ प्रो सिल्व्हर आयन अँटिव्हायरल एअर प्युरिफायर एका तासामध्ये 3 ते 4 वेळा हवा शुद्ध करतो, तसेच हवेतील व पृष्ठभागावरील जीवाणू व विषाणू नाहीसे करतो. USFDA व्यतिरिक्त, या उत्पादनाला MRI ग्लोबल, ATCC (अमेरिकन टाइप कल्चर कलेक्शन), SGS (जनरल सोसायटी ऑफ सर्व्हेलन्स-जिनिव्हा), FC, CE, ISO, UL, RoHS, UKRI मेडिकल रिसर्च कौन्सिल, CEN युरोपिअन कमिटी फॉर स्टँडर्डायझेशन यांनीही प्रमाणित केले आहे. ऑराबीटचा वापर 200 हून अधिक रुग्णालयांमध्ये, 200+ शाळांमध्ये केला जात असून 40 हून अधिक देशांत हवेचे कोविड-19 पासून संरक्षण केले जात आहे.


भारतात उत्पादन दाखल करत असताना ऑरॉबीट हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी फिल युएन यांनी नमूद केले, “जगभरात निर्माण झालेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑराबीट अँटि-कोविड डिसइन्फेक्शन तंत्रज्ञान विकसित केले आहे. सर्व लोकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर बंद खोलीतील वातावरण कोविड-19 पासून निर्जंतुक करणे गरजेचे आहे, असे आमच्या लक्षात आले. आमच्या अँटि-कोविड डिसइन्फेक्शन उत्पादनांना असलेली मागणी वाढली आहे. जगभरातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्पादनामध्ये वाढ करत आहोत.”


ऑराबीट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट दुद्दुकुरी यांनी म्हटले, “भारतासह जगभरामध्ये कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परिस्थिती पूर्वीसारखी सुरळित करायची असेल तर लोकांना पूर्वीप्रमाणे सर्व कामे सुरळित करण्याचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देणे आवश्यक आहे. ऑराबीटच्या जगभरात सिद्ध झालेल्या आणि मान्यताप्राप्त असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रेस्तराँ, थिएटर, इ. कोविड-19 विषाणूपासून सुरक्षित करता येऊ शकतात.” कोविड-19 विषाणूंबाबत MRI ग्लोबल या अमेरिकेतील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये केलेल्या प्रयोगिक चाचण्यांमध्ये, ऑराबीट AG+ सिल्व्हर आयन अँटिव्हायरस एअर प्युरिफायर 15 मिनिटांमध्ये कोविड-19 चे 99.9% विषाणू नाहीसे करू शकला. अन्यत्र केलेल्या प्रायोगिक चाचण्यांमध्येही, ऑराबीट AG+ सिल्व्हर आयनएअर स्टरलायझेशन प्युरिफाइंग तंत्रज्ञानाने एन्फ्लुएंझा विषाणू, फंगी स्टॅफिलोकोकस ऑरस व ई.कोली यांना 99.9% मारू शकण्याची क्षमता दर्शवली आहे.

कंपनी एअर फिल्टरेशन तंत्रज्ञानामध्ये जगभर आघाडीवर आहे आणि जगभरातील 40 हून अधिक देशांत सक्षमपणे कार्यरत आहे.ऑराबीटचे पेटंटेड सिल्व्हर आयन तंत्रज्ञान प्रीमिअम फाइव्ह-स्टेज फिल्टरेशन यंत्रणेवर आधारित असून, यापूर्वी या यंत्रणेचा वापर ऑराबीटची उत्पादने अतिशय विश्वासार्ह करण्यासाठी वैद्यकीय उत्पादनांमध्ये करण्यात आला आहे. याबरोबरच, ऑराबीट एअर प्युरिफायर वापरून हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड अशी प्रदूषकेही नाहीशी करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान रुग्णालये, घरे, शाळा, मूव्ही थिएटर, रेस्तराँ, कार्यालये अशा ठिकाणी अंतर्गत प्रदूषणावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!