ठाणे ता ११ ऑगस्ट (संतोष पडवळ) : २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमधे अवघा महाराष्र्ट भिजुन गेला…नव्हे नव्हे तर वाहुनच गेला. अतिषय दुर्दैवी असे अास्मानी संकट कोकणावर आले.
त्यात प्रामुख्याने चिपळुन, खेड आणी महाड वाहुन गेले. खुप मोठे नुकसान झाले अगदी लवकर भरुन न येण्यासारखे.अशा परिस्थीतीमधे राज्यातील प्रशासन अाणी लोकप्रतीनिधींसोबत या सहकार्यासाठी सर्व राजकीय पक्ष,संघटना,व्यक्ती स्वतःहुन पुढे आल्या अाणी त्यात भारतीय मराठा संघाने सुद्धा अध्यक्ष अविनाश पवार अाणी सरचिटणीस श्री.राजेंद्र पालांडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कमेटी, महाराष्र्ट कोअर कमेटी अाणी सर्वजिल्हा , तालुका, शहर, विभागाच्या संघटनेच्या पदाधीकारी व तळागळाच्या सदस्यांच्या साथीने नियोजनबद्ध ऊपक्रम राबऊन खारीचा वाटा ऊचलला.
कोकणच्या या मदतीसाठी भारतीय मराठा संघाकडे शेकडो हात पुढे आले. अाणी खरोखरच पुरग्रस्त अाणी अतिवृष्टीने बाधीत अशा १००० कुटुंबाकरीता मदत तयार करण्यात आली. हि मदत पोहचवण्याअाधी संघाकडुन खरोखरच ज्यांना मदतीची गरज अाहे अशी महाड, खेड, चिपळुन तालुक्यातील गावे, वाड्या अाणी त्यातील कुटुंब याची यादी बनवण्यात अाली यामधे प्रामुख्याने दुर्घटनाग्रस्त तळीये, पोसरे सोबत वरंध, शिवथर, दहीवली, साखर सुतारवाडी, शेवते, काळीज, खरवली, नाटेखींड, बिरवाडी, नडगाव, सोमगाव, कासई, तलवट, निवे चोरवणे अशा सह्याद्रीच्या शेवटच्या टोकापर्यंतची सर्वगावे समाविष्ट होती.
पुरग्रस्त कुटुंबाला चटई,ब्लँकेट,चादर,टॉवेल,साडी,भांडी,अन्नधान्य,मेडीकल किट अशी तर संपर्कक्षेत्रा बाहेरील व भुस्सखलन भागाला अन्नधान्य व मेडीकल किट वाटण्यात अाले. मदतीचे हात पुढे करतांना सद्य परिस्थीती पाहुन एका डोळ्यात अश्रु तर दुसर्या डोळ्यात मायेचा अधार देऊन मनाला समाधान झाले.
सदर ऊपक्रम हा संघटनेचे अनुभवी मराठा सदस्य महा.प्रदेश सचिव श्री.एस.डी.पाटील (आर्कीटेक्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.दिपक पालांडे,अजित जाधव, महेश महापदी यांच्या देखरेखीखाली दिवा शहर,मुंबई जिल्हा,ऊपनगर,ऊल्हासनगर,कल्याण,डोंबीवली,ठाणे,पालघर,नाशीक,पुणे, रायगड,नवी मुंबई येथील सर्व पदाधीकारी यांच्या अविरत मेहनतीने यशस्वी झाला. दोन दिवसांकरीता निघालेले मदतीचे पथक चार दिवस झाल्यानंतर सुद्धा मदत करुन परतले नाही हे पाहुन सर्वाना अभीमान वाटला. मराठा फक्त आरक्षण मागण्यासाठीच नाही तर जेव्हा जेव्हा समाजाला आमची गरज लागेल तेव्हा तेव्हा पुढे येतो आणी येतच राहील हे यातुन दिसुन अाले.
यामधे आनंदा सकपाळ, योगेश पवार, प्रकाश पाटील, अरुण फणसे, निकेश खानविलकर, विनोद जाधव, संपदा ब्रिद, विद्या कदम, सुनिता गव्हाणे, राज महाडीक, जयश्री मोरे, विजय पवार, अनिल कदम, प्रकाश पाटीलसर, अनघा जाधव, ऊमेश गोगावले, सचिन चव्हाण, सुदर्शन चव्हाण, ह्युमन राईट सघटना या सर्वांनी अतिषय कठोर परिश्रम घेतले.