ठाणे दि 12 :- ठाणे महानगरपालिका, ठाणे कार्यक्षेत्रात वाहतुक उप विभाग कापुरबावडी, कासारवडवली हद्दीत मे रिलायन्स ॲस्टॉल्डी जॉईंट व्हेंचर प्रा.लि. या कंपनीकडून मुंबई मेट्रो लाईन-4 चे माजीवडा ते घोडबंदर रोड, कासारवडवली पर्यंत काम चालू आहे.
मंजूर आराखड्यानुसार कॅडबरी जंक्शन ते कासारवडवली, गायमुख या दरम्यान बॅरीकेटींग करण्यात आलेली आहे. मे रिलायन्स ॲस्टॉल्डी जॉईंट व्हेंचर प्रा. लि.कडून मुंबई मेट्रो लाईन-4 चे माजीवडा ते घोडबंदर रोड कासारवडवली पर्यंत मेट्रो पिलर नं. 46 ते 201 असे पिलर बसविण्यात आले असून कापूरबावडी, मानपाडा, आनंदनगर, घोडबंदर रोड, कासारवडवली या दरम्यान पिलरवर दि. 12 ऑगस्ट 2021 ते दि. 15 ऑगस्ट 2021 या कालावधीत रात्री 23.00 वाजेपासून ते सकाळी 05.00 वाजेच्या दरम्यान गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करुन वाहतुक वळवावी लागणार असल्याने, सदर परिसरात वाहतुकीची कोंडी होवु नये व परिसरातील वाहतुक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरिता आम जनतेच्या सोयीसाठी. ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वाहतुक विभागाचे पोलीस उप आयुक्त म्हणून, मला महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र. एम.व्ही.ए.-116/सीआर/37/टीआर, दि.27 सप्टेंबर 1996 चे अधिसुचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम 115, 116 (1)(अ)(ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील प्रमाणे अधिसुचना जारी करीत आहे.
प्रवेश बंद :- मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापुरबावडी घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना तत्वज्ञान विद्यापीठ, कापुरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापुरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही कापुरबावडी सर्कल येथुन उजवे वळण घेवुन बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा मार्गे किंवा माजीवाडा अड्डाणपुलाखालून यु टर्न घेवुन खारेगांव ब्रिज, मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरची जड अवजड वाहने वगळून इतर हलकी वाहने तत्वज्ञान विद्यापिठ येथुन डावीकडे वळण घेवुन सर्व्हिस रोड मार्गे किंवा रवी स्टील, पोखरण रोड नं. 2, गांधीनगर, वसंत विहार सर्कल, खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- मुंबई कडुन बापुरबावडी जंक्शन तत्वाज्ञान विद्यापिठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिज वर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर जड अवजड वाहने ही नाशिक रोडने खरीगांव टोलनाका, मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरची वाहतुक अधिसुचना ही दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्रौ 23.00 वा. ते दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 05.00 वाजे पावेतो. दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी रात्रौ 23.00 वा. ते दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 05.00 वाजे पावेतो. दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी रात्रौ 23.00 वा. ते दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 05.00 वाजे पावेतो व दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी रात्रौ 23.00 वा. ते दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 05.00 वाजेच्या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पुर्ण होई पर्यंत अमलात राहील.
सदरची वाहतुक नियंत्रण अधिसुचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. असे बाळासाहेब पाटील, पोलीस उप आयुक्त, शहर वाहतुक शाखा, ठाणे शहर यांनी कळविले आहे.