डोंबिवली ( शंकर जाधव ) : कारवाईसाठी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत करोना नियमाचे पालन करणाऱ्या फेरीवाल्यांनी दादागिरी केल्याची घटना डोंबिवली पुर्वेकडील देसले पाडा येथील भोपर रोडवरील गार्डियन शाळेसमोरील परिसरात घडली.येथे नागरिकांची गर्दी होत असल्याने पालिका कर्मचारी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेले असता येथील फेरीवाल्यांनी आठवडा बाजार बंद करणार नाही अशी भूमिका घेत पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.मात्र अश्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले नाही.
करोना काळात नागरिकांची गर्दी टाळावी म्हणून पालिका प्रशासनाने आठवडा बाजारास बंदी घातली आहे.मात्र डोंबिवली पुर्वेकडील देसले पाडा येथील भोपर रोडवरील गार्डियन शाळेसमोरील परिसरात नेहमी बसणारे फेरीवाले करोनाचे नियम पाळत नाहीत.पालिकेच्या`इ`प्रभाग क्षेत्र हदीत हा परिसर येत असल्याने येथील बुधवारी फेरीवाला हटाव पथक कारवाई करण्यास गेले असता फेरीवाले आणि कर्मचारी यांच्यात हुज्जत झाली. ह्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात फेरीवाले दादागरी करताना दिसतात.आठवडा बाजारास बंदी असल्याचे कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना सांगूनही फेरीवाले ऐकत नव्हते.
याबाबत प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार यांना विचारले सदर ठिकाणी फेरीवाल्यांना बसू दिले नाही असे सांगितले`.फेरीवाल्यांना ना करोनाचे भय नाही` अश्या पद्धतीने येथील फेरीवाले आपले बस्तान बसवत असतात. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत करोना नियंत्रणात आला तरी नागरिकांनी मास्क परिधान करणे, सामजिक अंतर ठेवणे, सतत हात धुणे हे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र सदर ठिकाणी फेरीवाले करोना नियमाचे उल्लंघन करत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरीक करत आहेत.