अंबरनाथ दि.१७ (अब्दुलसत्तार वणू) :देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाले असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महिला विकास केंद्र (NGO) तसेच युवा मंथन मुंबई तर्फे फ्रेंड युथ ग्रुपच्यावतीने बळीराम पाटील ह्यांची सुकन्या लाजरी व किर्ती बळीराम पाटील यांच्यातर्फे “जाणीव जागृती शिबीराचे” आयोजन अंबरनाथ पश्चिम हनुमान नगर, फॉरेस्ट नाका या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिराताई कांबळे यांना देण्यात आले होते, तर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सुरेश कांबळे ह्यांनी देशभक्ती गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व फ्रेंड युथ ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी गीत, कविता, भाषणे सादर केली. तसेच यासमीन गुलाम शेख हिने “महिला आरक्षण” यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आलेल्या मान्यवरांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शॉल पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सौ. हिराताई कांबळे, पत्रकार तथा समाजसेवक अब्दुलसत्तार वणू, नितीन अरुण वाघमारे, स्वप्निल प्रभाकर वहाणे, मनिषा गोडसे, लक्ष्मी बनसोडे, इम्तियाज शेख, पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जाफर वणू, उपस्थित होते. तर युथ ग्रुपचे कार्यकर्ते तबस्सुम गुलाम शेख, यासमीन गुलाम शेख, खतीजा गुलाम शेख, सोनाली जयेश पाटील, दिपक रघुनाथ मावरे, आमीर उमर शाह, सत्तार शेख, नुरजाह शेख यांच्यासह विद्यार्थी भुषण संगारे, सानिया असलम शेख, ईशा मोरे, आरती पवार, विघन जाधव, प्रज्वल संगारे, रेहान सत्तार शेख, नयन जाधव, परशु विशाल, मनिषा विशाल, रोहन, तनवेश पवार, हरशु पयडे, परि मोरे, रेहान जाफर वणू हे सर्व उपस्थित होते.