मुंबई

कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी असून पण अद्याप ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही..

मुंबई (प्रतिनिधी: अवधुत सावंत) : राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस झाल्यानंतर लोकांना ट्रेनचे ट्रॅव्हल  पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे सरकारने १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकाग्रहात्सव ‘लोकल ट्रेन’ने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. परंतु, पहिल्या दोन दिवसांत निर्बंध शिथील होऊनही ट्रेनमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होऊन गेलेल्या लोकांना ट्रेनचे पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. सध्या लोकल ट्रेनने ‘ज्येष्ठ नागरिक’ आणि ‘अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी’ मोठ्याप्रमाणावर प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांना पूर्वीपासूनच लोकल प्रवासाची अनुमती होती. त्यामुळे ‘१५ ऑगस्ट’नंतर लोकल ट्रेन सामान्यांसाठी खुली होऊनही अजूनही गर्दीचे प्रमाण फारसे वाढलेले दिसून येत नाही.

मुंबईत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २०३०५४९ इतकी आहे. तर ६७२३४८  ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण झालेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८६४७१४ इतकी आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील १७३८२९ नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!