ठाणे (ता 18, संतोष पडवळ ): ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.

या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील कासारवडवली कोळीवाडा येथील स्टील्ट अधिक पाच मजली अनधिकृत इमारतीमधील मालदा उचलण्याचे काम सुरू आहे. वाघबीळ गाव स्टील्ट अधिक पाच मजलीअनधिकृत इमारतीवरील मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. तसेच माजीवडा उड्डाणपुलाच्या बाजूला मोकळ्या जागेवर लावण्यात आलेले लोखंडी अँगल व पत्र जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू आहे.
सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे, महेश आहेर आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली.