ठाणे

शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाच्या तपासात होणाऱ्या अक्षम्य दिरंगाई

ठाणे  दि.18 :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खून दि 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या दुःखद घटनेला येत्या २० ऑगस्टला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण  खुनाच्या तपासात होणा-या अक्षम्य दिरंगाई बाबत अंनिसने   ठाणे निवासी उप जिल्हाधिकारी यांना अंनिसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर,राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्य कायदा विभाग सहकार्यवाह,ऍड तृप्ती पाटील, निधी व्यवस्थापन विभाग सहकार्यवाह, सुधीर निंबाळकर, ठाणे जिल्हा कार्यकर्ता अमोल चौगुले विविध उपक्रम कार्यवाह ठाणे व अंनिसचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी अंनिसचे कार्यअध्यक्ष श्री. राजेश देवरुखकर म्हणाले की, डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुले, शाहू, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या विचारवंतांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात खर्च करून महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारात भर घातली आहे. आपण एका बाजुला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून पडतात हे महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. मुख्य धार्मिक मूलतत्त्ववादी सूत्रधारांना पकडण्या मध्ये ऊशीर होत आहे. जे लोक आणि संघटना या खूनांच्या मध्ये गुंतलेले आहेत त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अटक करणे आवश्यक आहे यासाठी आणि तपासात निर्णायक गती येण्यासाठी विशेष तपास टीम गठीत करावी 

           सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी एका कडक तातडीच्या कायद्याची गरज आहे असे आमचे मत आहे. कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक याच्या जीवाला सध्या आपल्या समाजात उघड धोका आहे. असे झाले तर सर्व लोक राज्य घटनेत दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्राच्या अधिकार उपभोगू शकतील.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!