ठाणे

केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात कल्याण-डोंबिवलीत जोरदार निदर्शने करत शिवसैनिक आक्रमक.

कल्याण-डोंबिवली (प्रतिनिधी: अवधुत सावंत)   : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कल्याण-डोंबिवलीतही ठिकठिकाणी शिवसेनेने केलेली आक्रमक निदर्शने पाहायला मिळाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आज सकाळपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतून ही याप्रकरणी शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळत आहे. डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौकात शिवसेना-युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारहाण करत तसेच कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. 


  डोंबिवलीप्रमाणे कल्याण पूर्वेतील गुंजाई चौकातही शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणी निदर्शने करण्यात आली. नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून यावेळी शिवसेनेने आपला संताप व्यक्त केलेला दिसून आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!