डोंबिवली ( शंकर जाधव ): माजी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा नगरसेवक मंदार टावरे यांच्या वतीने डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ईसीजी मशीन देण्यात आले.शास्त्रीनगर रुग्णालय अद्यावत झाले असले तरी शासन मात्र रूग आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यास कमी पडत असल्याचे यावरुन दिसून आले.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या शते शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांच्याकडे अत्याधुनिक ईसीजी मशीन सुपूर्त करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी नगसेवक मंदार टावरे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, पालिकेच्या रुग्णालयात अश्या प्रकारची व्यवस्था होणे अत्यंत गरजेचे आहे.प्रत्येक गरिब आणि गरजू रुग्णांना याची सेवा मिळाली पाहिजे. येणाऱ्या काळात महात्मा फुले योजनेअंतर्गत पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यावेळी देण्यात आलेल्या इसीजी मशीनद्वारे अनेकांना हृदय तपासणी करून घेणे सोपे होणार असून पाच ते सात मिनटात या मशीनद्वारे इसीजी रीपोर्ट देण्यात येतील. बॅटरी वर चालणारे हे मशीन वीज गेल्यानंतर देखील दोन तास सहज काम करू शकते अशी माहिती मशीन ऑपरेटर जडेजा यांनी दिली. माजी नगरसेवक मंदार टावरे म्हणाले शास्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या मागणीनुसार सदर मशीन आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांच्या सेवेसाठी देण्यात आली आहे. मशीनची देखभाल आम्ही करणार आहेत.
रुग्णालयातील भोंगळ कारभारावर संपापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचा आमदाराकडे तक्रारीचा पाढा
वाढदिवसानिमित्त रुग्णालयाला भेट देणासाठी आलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीचा पाढाच वाचला.सोनोग्राफी टेक्निशिअन नसल्याने पालिकेकडून रुणांच्या नातेवाईकांना ‘मोनोपोली‘ असणाऱ्या सोनोग्राफी सेंटरला जाण्यास सांगितल्याने संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या भोंगळ कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवासिनी बडेकर यांनी बाजू सावरत टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर रुग्णालयाची उद्वाहिका ( लिफ्ट ) देखील अनेक दिवसापासून बंद असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना उतारावरून जाण्यास त्रास होत आहे. यावरही डॉ.बडेकर यांनी नवीन उद्वाहिका ( लिफ्ट ) लावली जाणार आहे असे सांगितले असले तरी तरी तारीख मात्र सांगितली नाही.