गुन्हे वृत्त

धक्कादायक ; बापाची चार वर्षीय मुलाचे रेल्वे फलाटावर डोकं आपटून हत्या.

नवी मुंबई, ता 21, (संतोष पडवळ ) : नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्टेशनवर नवऱ्याने स्वतःच्या चार वर्षीय मुलाचे तीनदा डोकं आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक ३वर ही घटना घडली असून जीआरपीने हत्या करणाऱ्या बापाला अटक केली आहे. 

आरोपी सकलसिंह पवारचा दोन वेळा विवाह झाला आहे. त्याची पहिली पत्नी गावी असून तो सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईतील सानपाडा येथे राहत होता. मूळचा यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील हा आरोपी असून तो सानपाडा पुलाखाली दुसऱ्या पतीसोबत राहत होता आणि भीक मागून दिवस काढत होता. नेहमी त्याचे दुसऱ्या पत्नीसोबत वाद होत होते. रविवारी रात्रीपासून आरोपीचे दुसऱ्या पत्नीसोबत वाद सुरू होता.

सोमवारी सकाळी आरोपी आपल्या दुसऱ्या पत्नीसह, मुलाला घेऊन सानपाडा स्टेशनवर आला. सर्वजण एकत्र चालत असताना आरोप सकलसिंह पत्नीसोबत भांडत होता. याच रागातून तो आपल्या पोटच्या चार वर्षीय चिमुकल्याला उचलून फलाटावर आपटू लागला. यावेळी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. हा क्रूर प्रकार पाहून एका महिला प्रवासीने त्याला अडवले आणि मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही आरोपी सकलसिंह चिमुकल्याला आपटत राहिला आणि त्यात मुलाचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी सकलसिंह पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मृत चिमुकला प्रशांत हा आरोपीच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा होता.

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!