गुन्हे वृत्त

दिव्यात पत्नीच्या प्रियकराचा बनाव, पतीस भररस्त्यात पिस्तुल काढून रोखले व जीवे मारण्याची दिली धमकी

मुंब्रा पोलिसांनी ४८ तासात आरोपीस केली अटक

ठाणे / दिवा, ता 22, (संतोष पडवळ -प्रतिनिधी):  दिवा पूर्व येथील बेडेकर नगर येथे एकाने ता 15 सप्टेंबर रोजी रात्री  10.30 वाजता  दिवा आगासन रोडवर मानव- कल्याण हॉस्पिटल बेडेकर नगर येथे दोन अज्ञात व्यक्तींनी विना नंबरच्या मोटर सायकल वर येऊन सदर व्यक्तीवर पिस्तूल रोखून जीवेठार मारण्याची धमकी दिली व घटनास्थळावरून आरोपी फरार झाले याचे प्रसंगवधान राखून भयभीत झालेल्या व्यक्तीस शेजारच्या मांनव-कल्याण हॉस्पिटल मध्ये आश्रय घेतला.आरोपी पिस्तूलाच धाक दाखवून तेथून पळून गेले अश्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करून भा.ध.वी कलम५०६(२),५०४,३४१,१२० (ब)सह आर्म्स ऍक्ट ३,२५दाखल करण्यात आले.

दिवा पोलिसांनी CC TV फुटेज च्या आधारे गोपनीय माहिती व तांत्रिक तपास करत प्रत्यक्ष पिस्तुल चा धाक दाखवून गुन्हा करणाऱ्या आरोपीस दोन दिवसांच्या मुदतीस अटक करून राहिवाश्यांन मध्ये पसरलेल भीती  दायक वातावरण थंड झाले.

साजन जयदास पाटील (अंबरनाथ),मुख्य सूत्रधार सनी रुरेश राजभर (डोंबवली),रुपेश अभिमन्यू पाटील (पडले गाव,डोंबवली),अंकित मोरेश्वर शिंदे,(पनवेल),या आरोपीना ४८ तासात मुब्रा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अटक केली. अटक केलेल्या आरोपी पैकी रुपेश पाटील याचे तक्रारदाराच्या पत्नी सोबत प्रेमसंबंध होते सदर प्रेयसी पासून तक्रारदार विलग होऊन  त्यास धमकावून तक्रारदार पत्नीस सोडून जाईल असा कट रचत आरोपीने गुन्हा केलेला निष्पन्न झाले आहे.तसेच तक्रारदाराची दिवा डम्पिंग ग्राउंड येथे मोटरसायकल अडवून रोख रक्कम घेऊन प्राणघातक हल्ला केल्याचे देखील निष्पन्न झालं आहे.तपासा दरम्यान सनी राजभर याच्या कडून पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, मोटरसायकल जप्त करून सर्वांचे मोबाईल फोन देखील जमा करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त मा.श्री.जयजीत सिंग, श्री. सुरेशकुमार मेकला (सह पोलीस आयुक्त ठाणे शहर),मा.श्री.अनिल कुंभारे(अप्पर पोलीस आयुक्त) पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे शहर, मा. श्री अविनाश अंबुरे  पोलीस उप आयुक्त परिमंडळ 1,श्री.व्यंकट आंधळे सहायक पोलिस आयुक्त (कळवा) यांच्या मार्गदर्शनाखाली मुब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मधुकर कड , सहायक पोलीस निरीक्षक-श्री.एस.एस शेळके, सहायक पोलिस निरीक्षक श्री.संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक श्री.दीपक घुगे,पो/ना मोरे ६८४,पो/ना  तांबोरे,पो/२८०९साळुंखे,पो/ना७२९९ वैरागकर,पो/ना ६२४० रहिश् जाधव,पो/६१९६ मोरे,पो/ना७०५८पाटील ,पो/ना ३१४४ घोडके,पो.ना७११७ विजय सपकांले,पो.शी ४२८० शिंदे,पो.कॉ.माळी,या पथकाने केली व पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. शहाजी शेळके व पोलिस उप .निरीक्षक श्री.दीपक घुगे करत आहे

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!