पुणे : बॉलिवुड-मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ह्रिदमिस्ट आर्टिस्ट शैलेश कांबळे यांना आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे संगीत क्षेत्रामधील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार २०२१ चा जाहीर झाला आहे. लवकरच हा पुरस्कार शैलेशला प्रधान करण्यात येणार आहे.
शैलेश कांबळे अनेक बाॅलिवुड मराठी इंडस्ट्रीतील गायक, संगीतकारांन सोबत काम करत असतो. अनेक चित्रपटांना,अल्बममधील गाण्यांना अनेक प्रकारची वाद्य वाजवली आहेत. शैलेश मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील. सध्या मुंबई दादर येथे राहतो. बाॅलिवुडला शैलेश कांबळे याला पहिली संधी सुप्रसिद्ध जगविख्यात गायक शंकर महादेवन यांनी दिली. शंकर महादेवन, आनंद शिंदे अशा अनेक दिग्गजांन सोबत शैलेशने काॅन्सर्ट केले आहेत.शैलेशला ४ सप्टेंबरला नाॅमिनेशन मिळालं त्यानंतर दोन दिवसांनी ७ सप्टेंबर ला पुणे आर्ट बिट्स फौंडेशनच्या संस्थापकानी पत्राद्वारे शैलेशला कळविण्यात आले की महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार २०२१ आपल्याला जाहीर झाला आहे. तीन महिने या पुरस्काराची प्रोसेस चालू होती. आपल्या मेहनतीवर जिद्दीवर महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार २०२१ शैलेशने आपल्या नावावर करून घेतलं असून महाराष्ट्रातून तसेच महाराष्ट्र बाहेरील राज्यातून सुध्दा अनेकांनी शैलेशला अभिनंदन शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आनंदाचा क्षण असून रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शैलेशच कौतुक केलं आहे.रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.महाराष्ट्र राज्य युवा कला गौरव पुरस्कार जाहीर झाल्यामुळे शैलेशच्या अजून दुप्पट जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये,सोशल मिडियावर देखील शैलेशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शैलेश सोशल मीडियावर सुध्दा तेवढाच अॅक्टिव असतो.