ठाणे

ठाणे महापालिकेच्या १० ते १५ आजी-माजी सहाय्यक आयुक्तांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटिसा.

ठाणे, ता 8 ऑक्टो, : ठाणे महापालिकेच्या आजी-माजी १० ते १५ सहाय्यक आयुक्तांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटिसाएकीकडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असताना आता, गेल्या महापालिकेच्या सर्व साधारणसभेत झालेल्या ठरावाच्या आधारे कोरोना कालावधीत ज्या- ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात अनधिकृत बांधकाम झाले आहे. अशा आजी-माजी १० ते १५ सहाय्यक आयुक्तांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षात व कोरोना कालावधीत त्यांच्या कार्यकाळात किती बांधकामे झाली याची माहिती मागविली आहे. तसेच ती माहिती १५ दिवसात सादर करण्याचे आदेशही दिले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

शहरात बेकायदेशीर फेरीवाले असो या अनधिकृत बांधकाम असो त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातून ठाणे महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. तर मध्यंतरी सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर कारवाई दरम्यान फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्यांना आपली बोटे गमवावी लागली. तसेच त्यांनी हा हल्ला अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईतून झाल्याचे म्हटले. तर या हल्ल्यानंतर बेकायदेशीर फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर महासभा वर्दळी ठरली.

तसेच मध्यंतरी झालेल्या महासभेत महापौरांनी एक ठराव केला. त्यामध्ये ज्या-ज्या सहाय्यक आयुक्तांच्या कार्यकाळात बांधकामे झाली आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत म्हटले. त्यानुसारच, ठामपा अतिक्रमण विभागामार्फत १० ते १५ आजी माजी सहाय्यक आयुक्तांना नोटिसा पाठवून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बांधकामांची माहिती मागितली आहे. ही माहिती त्यांनी १५ दिवसात द्यावयाची आहे असेही म्हटले आहे. मात्र, ही नोटीस कोणत्या सहाय्यक आयुक्तांना बजावली आहे, त्या अधिकार्‍यांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!