मुंबई(शांत्ताराम गुडेकर ): सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे.
आदर्श मुंबई पाक्षिक व महाराष्ट्र न्यूज १८ न्यूज चॅनलच्या ८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श कोरोना योध्दा व विविध क्षेत्रात निस्वार्था उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांचा हिंदुस्तान बुक ऑफ अवॉर्ड २०२१ पुरस्काराने आंबेडकर भवन , कन्नमवार विक्रोळी येथे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर(रजि.)चा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते” हिंदुस्थान बुक आँफ अवाँर्ड -२०२१ देऊन गौरव करण्यात आला.यावेळी मुख्य संपादक डॉ.संजय भोईर व उपसंपादक नवनाथ कांबळे,प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी शुभानंद ,प्रसिद्ध दिग्दर्शक प्रसाद तारकर, कोळी गीत गायक अनिल वैती तसेच प्रसिद्ध इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर . डॉ. पवन अग्रवाल यांच्यासहित शिवसेना नगरसेविका सुवर्णाताई करंजे, शिवसेना नगरसेवक श्री उपेंद्र सावंत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब हांडे, प्रा . जयवंत पाटील यांच्या सहित विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक,शैक्षणिक ,वैद्यकीय ,पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर ,सचिव प्रदिप गावंड,खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्यावतीने श्री कृष्ण रात्र शाळा चेंबुर कँम्प येथे वह्या व गणवेश वाटप,स्नेह ज्योती अंध विद्यालय ,मंडणगड रत्नागिरी येथे दप्तर ,वह्या ,अन्नधान्य ,पाण्याची टाकी,कुलर,व खेळाचे साहित्याचे वाटप,विनोबा निवासी कर्णबधिर विद्यालय कर्जत येथे मोफत टि.व्हि संच,शिलाई मशिन,अन्नधान्य ,व खेळाचे साहित्याचे वाटप,चेंबुर येथे युथ कौन्सिल व पंचरत्न मित्र मंडळतर्फे भव्य रक्तदान शिबीर ,वनवासी कल्याण आश्रम ,चिंचवली गावा,पनवेल येथे अन्नधान्य वाटप व भव्य आरोग्यविषयक शिबीर ,मिनाताई कुरडे मुलींच्या वडाळा येथील रात्र शाळेत मोफत वैद्यकिय शिबीर व विद्यार्थीवर्ग सत्कार ,चेन्नई पुरग्रस्तांना मोफत औषधे वाटप,चेंबुर येथील वाडवली गावांमध्ये असणाऱ्या महानगरपालिका शाळेंच्या विद्यार्थीवर्गाचा सत्कार व विविध स्पर्धेचे आयोजन ,ताडवागले गाव ,पोयनाड,ता.अलिबाग,जि.रायगड येथे भव्य वैद्यकिय शिबीर ,चेंबुर येथील चेंबुर नाका आचार्य अत्रे शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियान , विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांचा अनेकदा गौरव व पुरस्कार समारंभाचे आयोजन,सिंधुताई सकपाळ यांच्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या संस्थेला देणगी,बोंबले आश्रम शाळा,माणगांव, कोकणात अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले आहे.हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचरत्न मित्र मंडळचे सतत समाजसेवेला पुढे असलेले पदाधिकारी,सदस्य,सभासद,हितचिंतक, आर.सी.एफ अधिकारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभते असे अध्यक्ष-अशोक भोईर कायमस्वरुपी सांगतात.मंडळांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ” हिंदुस्थान बुक आँफ अवाँर्ड-२०२१ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंडळाला अभिनंदनासह शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.