डोंबिवली ( शंकर जाधव ) : सहा वर्षापासून फरार असलेला आरोपीला पकडण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन (३१) असे अटक आरोपीचे नाव असून तो आंबिवली स्टेशनजवळील इंदिरानगर आठाळी रोडवरील इंदिरानगर येथे राहतो. सलमानवर कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाणे भादवि कलम ३९४,३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे ३(१),(२),३(२),३(४) कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
सलमान हा मुळचा मध्यप्रदेश मधील होशांगाबाद येथील तहसील पिपरिया राम मनोहर लोहिया वार्ड येथील आहे. गेली सहा वर्ष पोलिस सलमानच्या मागावर आहे. मात्र सलमान हा पोलिसाच्या जाळ्यात सापडत नव्हता. सलमानवर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.पोलिसांचा हाती कधीच लागणार नाही असा समज असलेल्या सलमानला पोलिस शोध घेत आहे याची कल्पना नव्हती. सलमानला बेसावध झाल्यावर आपल्या हाती लागेल असे पोलिसांना माहित होते. त्याच्या तपास सुरु असताना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढली. सलमान हा खडवली परिसरात येणार असल्याचे खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यावर या ठिकाणी सापळा रचला.या ठिकाणी सलमानआल्यावर सापाला रचून बसलेल्या पोलिसांनी सलमानला अटक करून मुसक्या आवळल्या. पोलिसांनीत्याच्याकडील हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला.
सदर आरोपी याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या आरोपी सलमानला मुद्देमालासह पुढील तपासासाठी महात्मा फुले चौक पोलिसांच्या हवाली केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलिस हवालदार कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी कामगिरी पार पाडली