ठाणे

थॅलसेमिया आजार असलेल्या १४० रुग्णांना प्लाझ्मा ब्लड सेंटरकडून मोफत रक्ताचा पुरवठा

डोंबिवली ( शंकर जाधव ): डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लड सेंटरकडून थॅलसेमिया आजार असलेल्या १४० रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा केला जात आहे. नमस्कार मित्र मंडळाच्या वतीने डोंबिवली पश्चिमेकडील `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोरील नमस्कार मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सेंटरच्या मेडिकल सोशल वर्कर चारू बोरगावकर यांनी माहिती दिली.

   कोरोना काळात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा कमी होता. यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर,माजी नगरसेविका सरोज भोईर, मंडळाचे अध्यक्ष भगवान मोरजकर यांसह उपाध्यक्ष  राघवेंद्र कुलकर्णी, सरचिटणीस राहुल सुर्वे, खजिनदार स्वप्नील मोरजकर, प्रीतेश म्हामुणकर यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी तरुणवर्गाचा जास्त प्रतिसाद होता.यावेळी प्लाझ्मा ब्लड सेंटर मेडिकल सोशल वर्कर चारू बोरगावकर म्हणाल्या, शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी हिमोग्लोबिन आवश्यक असते. मात्र अनुवंशिकतेमुळे होणाऱ्या थॅलसेमिया या आजारात हिमोग्लोबिनची निमिर्ती होण्याचे प्रमाण कमी होते किंवा काही वेळा अजिबातच निमिर्ती होत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचा कमी अधिक पातळीवरील अॅनिमिया होतो. प्लाझ्मा ब्लड बँक तर्फे नमस्कार मित्र मंडळाच्या सहकार्याने रक्तदान शिबीर उपक्रम हाती घेतला होता. रक्ताचत  सतत फारच गरज असते. प्लाझ्मा रक्तपेढी कधीही रक्त फुकट जाऊ देत नाही. कोरोना काळात रक्तदान प्रक्रिया कमी होत होती. त्यामुळे रक्तसाठा झाला नाही. आता लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे लसीकरण केल्यानंतर रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही यावेळी केले.नमस्कार मित्र मंडळ अध्यक्ष भगवान मोरसकर म्हणाले,कोरोना काळात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा साठा कमी होता. यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून नमस्कार मित्र मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिर माध्यमातून नागरिकांना आवाहन आहे की, आपण जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करा. आपला महाराष्ट्र, आपल्या देशाशी आपलं नातं आहे हे सिद्ध करा.या शिबिरात टेक्नीशियन सुसन अब्र्हम, रंजना जाधव, प्रकाश गौरव आणि आकांक्षा पवार आदि उपस्थित होते.तर मंडळाचे सिद्धेश मालवणकर, संदीप काळे, राहुल सुर्वे, रागव्वेंद्र कुलकर्णी, आशिष सुर्वे आदींनी मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!