ठाणे

पाणी पुरवठा बंद असताना ठामपाने दिवावासीयांना टँकरने पाणी पुरवठा करावा- निलेश पाटील, भाजप.

ठाणे / दिवा ता 14 ऑक्टो, ( संतोष पडवळ) :-एमआयडीसी ची पाईपलाईन वारंवार नादुरुस्त होत असल्याने त्याचा फटका दिवा शहराला बसत असून यामुळे त्या काळात दिव्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होते.नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि किमान पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाणी पुरवठा बंद असताना ठामपाने दिवावसियांना टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी भाजपचे निलेश पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात निलेश पाटील यांनी म्हटले आहे की,मागील काही दिवसांपासून दिवा शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे.एमआयडीसीची पाणी पुरवठा पाईपलाईन नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत.अचानक पाणी पुरवठा बंद झाल्याने आधीच पाणी टंचाई असणाऱ्या दिवा शहरात पाण्याची मोठी समस्या निर्माण होत असल्याकडे निलेश पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

आपण दिवा शहरासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पाणी पुरवठा बंद असणाऱ्या काळात महापालिका प्रशासन मार्फत टँकरने पाणी पुरवठा करावा,जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल.जे नागरिक पाणी बिल वेळेवर भरतात अशा नागरिकांना पालिकेने पाणी समस्येच्या काळात टँकरने पाणी पुरवठा केल्यास पाणी बिल भरणाऱ्यांची संख्याही वाढेल आणि नागरिकांची गैरसोय देखील दूर होईल असे निलेश पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!