ठाणे

दिव्यात सम्यक बुध्द विहारचे लोकार्पण.

ठाणे / दिवा,दि.19 ऑक्टो, (संतोष पडवळ) : दिव्यात सम्यक बुध्द विहारचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. सम्यक बुध्द विहारचे शिस्तबद्ध आणि सुंदर नियोजनबद्ध असा कार्यक्रम संपन्न झाला.अन्त भदंथ बोधानंद यांच्या उपस्थितीत मार्गदनाखाली लोकार्पण करण्यात आले .

प्रसंगी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या सहकार्याने तसेच रामभाऊ तायडेसाहेब (आर पी आय) आणि नगरसेवक दीपक जाधव याच्यासह दिवा नगरीतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले.

कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे माजी उप महापौर श्री रमाकांत मढवी, चरण म्हात्रे , हिरा पाटील ,सकल मराठा संघाचे ठाणे दिवा शहर समन्वयक प्रविण उतेकर यांच्यासह श्री पाटणे, व तर अनेक संघटनांच्या मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित राहून जनतेने देखिल सर्वधर्मसमभाव हा छान संदेश देउन कार्यक्रमाची शोभा वाढवून सम्यक बुध्दविहारच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या कार्याचा अभिमानाने गौरव केला

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!