मुंबई

पोलीस स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 21 : देशाच्या आणि समाजाच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शूर पोलिसांच्या स्मृतिस, मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना अभिवादन केले.

पोलिस हुतात्मा दिनानिमित्त नायगाव पोलिस मैदान, मुंबई येथे आयोजित मानवंदना कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्य मंत्री (शहरे)सतेज पाटील, गृह राज्य मंत्री (ग्रामीण)शंभूराज देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी भारतातील विविध पोलीस दलातील 45 पोलीस अधिकारी आणि 332 पोलीस अंमलदार अशा एकूण 377 हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!