मुंबई

मुंबईतील अविघ्न इमारतीच्या १९ मजल्यावर आग ; एकाच मृत्यू तर दोषीवर कडक कारवाई करणार – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई ता 22 ऑक्टो, (संतोष पडवळ) : मुंबईतील करीरोड स्टेशन जवळील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वन अविघ्न पार्क असं या इमारतीचे नाव असून इमारतीच्या १९ मजल्यावर आग लागल्य़ाची माहिती समोर आली होती. अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. मात्र या आगीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १९ व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. त्यावेळी आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई आयुक्त इक्बाल चहल यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व घटनेची पाहणी केली. तसेच दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

इमारतीमधील अश्निशमन यंत्रणाच बंद – महापौर किशोरी पेडणेकर
अविघ्न इमारतीच्या सिक्युरिटीकडे १५ मिनिट होती, त्या १५ मिनिटात गाद्या टाकल्या असत्या तर राम तिवारी नामक व्यक्तीचा जीव वाचवू शकले असते. अग्निशमन दलाचे जवान पोहचताच लगेच आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले, अनेक लोकांना बाहेर काढलेलं आहे. अद्यापही दोन जण अडकल्याचे सांगितले जात आहे. त्या व्यक्तींची कोणत्या परिस्थिती आहे याची माहिती नाही. अद्याप परिसरत धूराचे लोट पसरले आहेत. ही ४ लेवलची आग असल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. व्यक्तीच्या मृत्यूवरून अग्निशमन दलाच्या जवानांवर आरोप करणं चुकीचे आहे. या इमारतीमधील अश्निशमन यंत्रणाच बंद होती. याप्रकरणात कडक कारवाई केली जाईल. असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!