ठाणे

सरकारी योजनाचा लाभ मिळणाऱ्या भाजपच्यावतीने ई-श्रम कार्डचे वाटप

  डोंबिवली ( शंकर जाधव ) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व नागरिकांना सरकारी योजनाचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत.या योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई-श्रम कार्ड आवश्यक आहे.भाजप माजी नगरसेविका रविना माळी यांनी आमदार रविद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार नागरिकांना सरकारी योजनांचे  महत्व समजाविले.देसले पाडा येथील येथील जय मल्हार भवन येथे भाजप डोंबिवली ग्रामीण महिला मंडळ अध्यक्षा सुहासिनी राणे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका माळी यांनी येथील नागरिकांना ई-श्रम कार्डचे वाटप केले.

हे कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड मोबाईल नंबरशी लिंक व बँकेचे पास याची आवश्यक आहे.या योजनांचा १८ ते ५९ वर्षापर्यतच्या नागरिकांना मिळणार आहे.डोंबिवलीत भाजपच्या वतीने नागरिकांना ई-श्रम कार्ड वाटप सुरु आहे.डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोडवरील भाजप जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी या कार्डचे वाटप करण्यात आले. तर भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयातही कार्डचे वाटप होणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!