डोंबिवली ( शंकर जाधव ) : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एनसीसी प्रगती महाविद्यालयाच्या वतीने डोंबिवली शहरात स्वच्छ भारत जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. “स्वच्छ भारत, सुरक्षित भारत” नावाचे फलक हातात घेऊन व घोषणा देत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी लोकांचे लक्ष वेधले.
ले.कर्नल एस.एस. मिसकिथ, कमांडिंग ऑफिसर व प्राचार्या डॉ.ज्योती पोहाणे यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार रॅलीचे संचालन सी.टी.ओ.डॉ.मनोज मकवाना यांनी केले.
\डोंबिवली रेल्वे स्टेशन येथून रॅलीची सुरुवात झाली तर ख्य समारोप प्रगती कॉलेज येथे करण्यात आला. स्वच्छ भारत उपक्रमात जागरूकता निर्माण करणे, लोकांचे एकत्रीकरण करणे आणि त्यांचा विकास सुनिश्चित करणे हे या रॅलीचे उद्दिष्ट होते.