ठाणे

युवा स्वास्थ कोविड-१९ लसीकरण मोहिमेत ५५० महाविदयालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण

     डोंबिवली ( शंकर जाधव )  : युवा स्वास्थ कोविड-१९ लसीकरण मोहिमेस  २५ ऑक्टोबरपासून महापालिका परिसरातील, महाविदयालयांमध्ये १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या  युवा स्वास्थ कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस महाविदयालयात चांगला  प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी दिवसभरात बिर्ला महाविदयालय,पेंढारकर महाविदयालय,प्रगती महाविदयालय, मॉडेल महाविदयालय, सोनवणे महाविदयालय,कमलादेवी कॉलेज,केरलीया समाजम मॉडेल महाविदयालय, मातोश्री व्ही.डी.एच.कॉलेज  या १८ महाविदयालयातील १८ वर्षांवरील ५५० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना  कोविड लसीकरण करण्यात आले, यामध्ये २५७  विद्यार्थ्यांना कोविड लसीकरणाची पहिली मात्रा आणि २९३ विद्यार्थ्याना  कोविड लसीकरणाची दुसरी मात्रा घेतली. 

महापालिका परिसरात सुमारे ३० महाविदयालये असून उर्वरित महाविदयालयातील लसीकरणापासून वंचित राहिलेल्या महाविदयालयीन विद्यार्थ्यांची माहिती मिळाल्यानंतर  महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत युवा स्वास्थ कोविड-2९ लसीकरण मोहिमेअंतर्गत २५  ऑक्टोबर ते २  नोव्हेंबर या कालावधीत त्यांचेही कोविड लसीकरण महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!