ठाणे

तुमच्या मदतीने साजरी होईल स्वमग्न विद्यार्थ्यांची दिवाळी… विद्यार्थ्यांनी बनवले दिवाळीच्या वस्तू

       डोंबिवली ( शंकर जाधव ) : टाळेबंदीने सर्वांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यातून मार्ग काढत राज्य सरकारने शितीलता दिल्याने दैनदिन जीवन पूर्वपदावर येत आहे.दिवाळी सणही जवळ आला असून आपल्या खिशाला परवडेल अश्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी खरेदीला बाहेर पडताना दिसतात.बाजारपेठेत गर्दी वाढल्याने दुकानदारांचे `अच्छे दिन`ची सुरुवात झाली आहे.परंतु आजही समाजातील अनेक वर्ग असा आहे कि त्यांची दिवाळी जनतेवर अवंलबून आहे.करोना काळात  आई-बाबांनी संपूर्ण दिवस काळजी घेतली आता आपण अस काही कराव कि आई-बाबाच नव्हे तर सर्वांनी आपले कौतुक करावे अशी भावना ठेवून डोंबिवलीतील स्वमग्न विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या वस्तू बनवल्या.आपल्याच शाळेत या वस्तूंचे प्रदर्शनहि  भरविले. विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या अंगी कला पाहून पालकवर्गानी  या वस्तू खरेदी केल्या.

  डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्नचे ऑटीस्टिक आणि गतिमंद मुलांसाठी शाळा सुरु आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेली शाळा करोना काळात बंद होती.करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने टाळेबंदिला शिथीलता देऊन शाळा-महाविद्यालये सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.डोंबिवलीतील हि शाळा सुरु झाली असून या शाळेत सात ते आठ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेत आहेत.दरवर्षी प्रमाणे यंदाही या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणासाठी आकर्षक कंदील,पणत्या,अगरबत्ती,उटणे इत्यादी वस्तू बनविल्या.या वस्तू इतक्या आकर्षक बनविल्या आहेत कि, वस्तू पाहताच या विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण असल्याचा पुरावाच दिसतो.या वस्तू मंगळवारी शाळेत प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या.पालकवर्ग वस्तू  पाहण्यासाठी आवर्जून येतात.प्रदर्शनासाठी या वस्तू अश्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत कि वस्तू पाहताच ग्राहकांना  विकत घेण्याचा मोह आवरत नाही.

दिवाळीच्या वस्तू पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आली.या विद्यार्थ्यांच्या  त अंगी असलेली हि कला समाजाला माहिती पडणे आवश्यक आहे जेणेकरून या विद्यार्थ्यांना आणि हे इन्स्टिट्यूट चालविणाऱ्यांना समाजाकडून सहनुभितीचा नव्हे तर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल.

                                                                   पालक – सचिन पाटील ( दिवा )

 गेली पंधरा वर्ष शाळा सुरु आहे. विद्यार्थ्याना प्रोत्साहन मिळते. विद्यार्थ्यांची हि कला समाजासमोर आणणे हाच आमचा उद्देश आहे.शिक्षकववर्गही या विद्यार्थ्यांना शिकविताना खूप मेहनत घेत असून या वस्तू विकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

                                                                 कांचन पवार ( मुख्याध्यापिका )  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!