ठाणे

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी मास्कचा वापर बंधनकारक ;राज्य शासनाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करावे- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाणेदि.27 : कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय तसेच खासगी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अधिकारीकर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्याबाबत राज्य शासनाने आदेश जाहीर केले आहेत. त्याचे पूर्णपणे पालन करावेअशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

     राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल दि. 26 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे कीकोरोना प्रार्दुभावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अर्थचक्रास गती देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापनशारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोरोनाच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला.  या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या लाटेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम प्राधिकारी तसेच राज्य व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी हे आदेश जाहीर केले आहेत.

        आदेश असे आहेत : 1) राज्यातील मंत्रालयअधिनस्त कार्यालय,विधानभवनासह सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी – कर्मचारी तसेच कार्यालयात येणारे सर्व अभ्यागतांनी कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईलअशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

            2) सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी- कर्मचारी यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुख,आस्थापना प्रमुख यांनी करावी. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास जवळच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करून त्यांचे लसीकरण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करावेत.

            3) सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणेयावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुखकार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.

            4) कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्याने विनामास्क वावरणारे अभ्यागतकर्मचारी,अधिकारी यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी संबंधित कार्यालय प्रमुखांनी सक्षम प्राधिकारी नामनिर्देशित करावा.

            5) विनामास्क अभ्यागतकर्मचारी,अधिकाऱ्याकडून सक्षम प्राधिकारी दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी ही दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल तसेच आहरण व संवितरण अधिकारी  दंडाची रक्कम शासनाने निश्चित  केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!