डोंबिवली ( शंकर जाधव ) : ‘आम्ही किल्लेकर आणि वयम्’ यांच्यावतीने आयोजित किल्ला स्पर्धेमध्ये ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा शाळेतील विद्यार्थ्यांनी पन्हाळागड किल्ल्याचा देखावा उभारला आहे. ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल मुंब्रा च्या विद्यार्थ्यांनी सहावी ते आठवी या विद्यार्थ्यांनी प्रतापगड हा किल्ल्याचा देखावा उभारला होता .विद्यार्थ्यांना इतिहासाची आवड निर्माण व्हावी आणि गड किल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी गेली दहा वर्षे किल्ले बांधणी उपक्रम राबवित आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पन्हाळगड किल्ल्याची प्रतिकृती दहा मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उभा केला.
किल्ले बनविण्यासाठी शाळेचे अध्यक्ष सतिश देसाई सर, समीर देसाई सर, उपाध्यक्षा शिवानी ,खजिनदार प्रविणा यांनी प्रेरणा दिली.या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे कॉफीचा कप ही भेटवस्तू देण्यात आली. किल्ल्याचे परीक्षण करण्यासाठी आम्ही किल्लेकर ,आणि वयम् ,यांचे वतीने मान्यवर परीक्षक प्रकाश माळी , ज्ञानदीप विद्यामंदिर मंदिरचा मुख्याध्यापिक माधवी कदम व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका पूर्वा गुजर उपस्थित होते.