डोंबिवली ( शंकर जाधव ) ; शिवसेना युवासेना डोंबिवली शहराच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य किल्ले बांधणी स्पर्धेत लहान व तरुण वर्गांनी वयोगटातील सहभाग घेतला होता.किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, खऱ्या किल्ल्यासारखे केलेले हुबेहूब बुरुज, माची, बालेकिल्ले, धान्य व दारुगोळा कोठार, गुप्त दरवाजा, राजमहल, विहिरी तलाव याबाबत स्पर्धेत सहभागी मुलांनी माहिती दिली.मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी इमारतीमधील त्यांची वडीलधारी मंडळीदेखील हजर होती.एकूण नोंदणी झालेल्या १०४ किल्यांपैकी डोंबिवली पूर्व विभागातील ५६ किल्ल्यांचे परीक्षण करण्याचे नियोजित केले होते.
प्रत्येक किल्ला बनवताना सहभागी झालेल्या मुलांची संख्या, तांत्रिकदृष्ट्या केलेली बांधणी, त्यांनी मिळविलेली माहिती यामुळे परीक्षकदेखील तेथे खिळून राहिले.रात्री १ पर्यंत २६ किल्ल्यांना भेट दिल्यानंतर परीक्षण थांबवण्यात आले व उर्वरित किल्यांचे आणि डोंबिवली पश्चिम विभागातील किल्ल्यांचे दोन दिवसात परीक्षण होणार आहे.परीक्षण करत असताना सोबत ४ परीक्षक व युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे,उपविभाग प्रमुख स्वप्नील वाणी,सागर इंगळे,शिवसैनिक कौस्तुभ फकडे,निशीत पालवनकर,निखिल साळुंखे,करण कोतवाल,महेश बुट्टे,वैभव चौधरी उपस्थित होते.