ठाणे

कल्याण शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठांनकडून वार्डनना कडक वँक्शीन, डोस ?

कल्याण (संजय कांबळे) : सतत लोकांशी संपर्कात येणाऱ्या आणि वाहतूक सुरळीतपणे चालू रहावी म्हणून महत्त्वाची भूमिका/जबाबदारी पार पाडणाऱ्या वार्डन अर्थात वाहतूक पोलिसांचा मदतनीस यांना कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे चांगलेच व्हँक्शिन दिले आहे. तसेच उपदेशाचे डोस देखील पाजले आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून चांगल्या सेवेची अपेक्षा व्यक्त करुया.

झपाट्याने नागरिकरण झालेल्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी ची समस्या निर्माण होत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिंवडी,कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवली, बदलापूर, निळजे लोढा परिसर, काल्हेर, पुर्णा, कोपरी ठाणे आदी ठिकाणी सदैव वाहतूक कोंडी झालेली दिसते. अपुरे वाहतूक पोलीसांच्या संख्खेमुळे त्यांच्यावर कामाचा भंयकर ताण येतो, तो दूर करण्यासाठी, तसेच वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी ‘वार्डन’अर्थात मदतनीस निर्माण करण्यात आले आहेत. तरुण तसेच थोडेफार वयस्क यांना प्रशिक्षण देऊन त्यांची याकामी मदत घेतली जाते. यांचे मानधन संबंधित महापालिका देते,परंतु हे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रणाखाली सेवा देत असतात. केवळ आणि केवळ वाहतूक कोंडी सुरळीतपणे व्हावी, तसेच वयोवृद्ध, जेष्ठ नागरिक, अंध अपंग, यांना रस्ता पार करण्यासाठी मदत करणे,वाहन रस्त्यावर च बंद पडले तर त्यांना सहकार्य करणे अशी मोजकी च कामे नेमून दिली असताना, तसेच यांचा युनिफॉर्म निळी टोपी,पांढरा शर्ट, व निळी पँट असा असताना मंध्यंतरी यांनी कहरच केला.

बिनधास्त छोटी मोठी वाहने अडविने,त्यांचा परवाना, इन्शूरन्स,पियूसी,आदी कागदपत्रे तपासणे,प्रंसगी पावत्या बनविणे, यातून बक्कळ माया गोळा करणे, हे सर्व सहकारी वाहतूक पोलीस, व वरीष्ठाँच्या पोहचवणे, असे सर्रास चालू होते. विशेष म्हणजे वरीष्ठांची देखील याला मुकसंमत्ती होतीच?यातून ही कोणी तक्रार केली तर वार्डन ला ‘बळी’द्यायला काहीच अडचण नव्हती, कारण तो कर्मचाऱ्यांमध्ये मोडत नव्हता, काही महाशय तर वाहतूक पोलिसांची वर्दी देखील घालून रस्त्यावर वावरत होते. दारु, मटण गुटखा, आदी इतर व्यसने ही नित्याची झाली होती. त्यामुळे वार्डन साहेब हे सिंघम प्रमाणे वागताना दिसून येत होते. परंतु हा त्रास अधिक च वाढल्याने पत्रकार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, जागृत नागरिक यांनी या विरोधात अनेक तक्रारी केल्या. याचा परिणाम म्हणून यांच्या वर अंकुश लावण्यात आला. अनेक वरीष्ठ पोलीस अधिका-यांनी यांचेवर घरी बसण्याची कारवाई केली. यामध्ये वपोनी श्रीकांत धरणे यांचे प्राधान्याने नाव घ्यावे लागेल. तुटपुंज्या मानधनात अनेक वार्डन टकाटक जीवन जगत होते.

अर्थात सर्वच वार्डन वाईट अथवा भ्रष्टाचारी आहेत असे मुळीच नाही. अनेक वार्डन यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. कित्येकांनी मोटारसायकल चोर,चोरटी वाहतूक पकडली आहे,त्यामुळे अशा वार्डन च्या पाठीवर शाबासकी ची थाप पडायलाच हवी,कारण नाही म्हटले तरी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यामध्ये त्यांचा सिहांचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. तेही अंत्यत कमी मानधनात!

कल्याण शहराचा विचार केला तर ५०-६०हजार रिक्षा,लाखो मोटारसायकल, शेकडोंनी मोठी वाहने,रस्त्यावर दिसतात,३०/३२वार्डन,, अंबरनाथ,२०/२४,तर उल्हासनगर१५/२०वार्डनमुळे या शहरातील दळणवळण सुरळीतपणे सुरू त्यामुळे यांच्या कडून, प्रवासी, वाहनचालक, नागरिक यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून कल्याण शहर वाहतूक शाखेत नवनियुक्त वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी पदभार स्विकारताच सर्व वार्डन यांची एक बैठक घेऊन त्यांना सक्त ताकीद, सूचना, आणि मार्गदर्शन केले. तर या आधीचे व.पो.नी सुखदेव पाटील यांची अंबरनाथ येथे बदली झाली आहे. त्यामुळे आता वार्डन केवळ वाहतूक व्यवस्था  व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करुया

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!