ठाणे

किरण वस‌ईकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली येथील  ग. ग. भोईर शिक्षण मंडळ संचलित गावदेवी विद्यामंदिर येथे  किरण रवींद्र वसईकर हे मागील बावीस वर्षापासून सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र आर.एस.पी. अधिकारी म्हणून त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या शैक्षणिक  व सामाजिक बांधिलकीची दखल घेत महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ओरिसा स्टेट आणि नीती आयोग पुरस्कृत समाजरत्न कोरोना योद्धा व मानद डॉक्टरेट पदवी राजभवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच आर. एस. पी.महासमादेशक महाराष्ट्र राज्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह  देऊन किरण वसईकर यांचा सन्मान करण्यात आला.


    शालेय, सहशालेय उपक्रमातून अष्टपैलू विद्यार्थी घडविणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणणे, कॅन्सरग्रस्त रोग्यांसाठी मदत करणे आश्रम शाळेतील अनाथ मुलांना मदत करणे अंधश्रद्धा निर्मूलन करण्याच्या कामात सहकार्य करणे तसेच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ,चला इंग्रजी बोलू या, या पुस्तकाचे प्रकाशन केले तसेच क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांकरिता राबवतात. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या महामारी च्या काळात जनतेची सेवा प्रामाणिकपणे करीत आहेत गोरगरीब लोकांना मदत करणे त्यांना अन्नधान्य पुरविणे पूरग्रस्तांना मदत करणे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविला  अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग घेतला ते  उपक्रमशील शिक्षक म्हणूनही ओळखले जातात. यावेळी वसईकर म्हणाले,  माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद व त्यांचं सहकार्य मिळालं त्यामुळे शाळा व सामाजिक कामासाठी पुरेसा वेळ देता आला.

ग्लोबल पीस फाउंडेशनचे आंबेसेटर व डायरेक्टर मणिलाल  शिंपी यांचे  बहुमुल्य मार्गदर्शन लाभले. शाळा व संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सन्माननीय केशव भोईर , शाळेच्या माजी मुख्याध्यापिका स्मिता सूर्यवंशी , मुख्याध्यापक  घावट व सर्व माझे सहकारी शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.आई वडीलांसह संस्था अध्यक्ष  शिक्षणमहर्षी केशव भोईर यांनी  किरण वसईकर यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!