ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश लागू

   ठाणे दि.11 :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि.11 नोव्हेंबर 2021 रोजी 12:00 ते  दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी 12 वाजेपर्यंत या कालावधीत पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.

दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु जयंती, दि.15 नोव्हेंबर 2021 रोजी तुलसी विवाह,तसेच दि.18 नोव्हेंबर 2021 रोजी त्रिपुरारी पौर्णिमा व  दि.19 नोव्हेंबर 2021 रोजी गुरुनानक जयंती हे उत्सव साजरे होणार आहेत.या सणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

            शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठया किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणती ही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक पदार्थ किवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्यशासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ.कृत्यांना या आदेशान्वये मनाई करीत आहे.

           सदरचा आदेश प्रेतयात्रा, लग्नाची मिरवणूक तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लेखी परवानग्या घेवून काढलेल्या मिरवणूकीस लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांचे वरिष्ठांचे आदेशानुसार अगर कर्तव्याच्या किंवा अपंगत्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!