ठाणे

नांदिवलीत पाणी समस्या सुटणार..नाले बांधणीसह रस्ता काँक्रीटीकरण सुरू

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत डोंबिवली जवळच्या नांदिवली येथे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जालीम तोडगा काढला आहे. पावसाळ्यात पहाणी दौऱ्यादरम्यान नागरिकांना आश्वासनानुसार खा. डॉ. शिंदे यांनी त्यांचा मुबलक निधी खर्ची करून पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या बुधवारी भूमिपूजन करून सोडवली. 

  खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा शुभारंभ बुधवारी डोंबिवलीत संपन्न झाला. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे,माजी  नगरसेविका रुपाली म्हात्रे, माजी सरपंच रवी म्हात्रे, उमेश पाटील,  यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागातील महिलांनी खा. डॉ. शिंदे यांच्याकडे पाण्यासह अंतर्गत रस्त्यांबाबत सूचना मांडल्या. गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याची समस्या सतावत तर आहेच, शिवाय रस्त्यांचीही पुरती दुर्दशा झाली आहे. यावर नगरसेविका रुपाली म्हात्रे आणि रवी म्हात्रे यांनी एमआयडीसीकडून येणाऱ्या पाण्याचे प्रेशर वाढविण्याची गरज असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले.

अंतर्गत नवा रस्ता करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाशी बोलणी करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी खा. डॉ.  शिंदे यांनी यावेळी बोलताना खात्री दिली.नांदीवलीच्या स्वामी समर्थ मठ चौकामध्ये पावसामुळे तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मार्गी लागणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी  सांगितले. प्रभाग क्रमांक ११२ मध्ये मंगलदीप सोसायटी ते आशापुरा आर्केड दरम्यान काँक्रीटीकरण रस्ता आणि नांदिवली पंचानंद येथील नांदिवली नाला ते लाईफ केअर हॉस्पिटलपर्यंत मोठा नाला बांधण्यात येणार असून त्या कामाला तात्काळ सुरुवात होणार असल्याचेही खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले.

यासाठी माजी नगरसेविका रुपाली म्हात्रे, रवी म्हात्रे, उमेश पाटील, सुधीर पाटील यांच्या सूचनेनुसार नाल्याचे काम होत असल्याचे यावेळी  खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!