गुन्हे वृत्त

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

डोंबिवली : झुंबर दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीतास गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ५ तासाच्या आत अटक करण्यात विष्णूनगर पोलिसांना यश आले आहे. सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास या प्रकरणी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५४, सह बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ चे कलम २, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील तक्रारदार मुलगी ९ वर्षांची आहे. तिला लाईटचा झुंबर दाखविण्याचा बहाणा करून आरोपीने त्याच्या राहते घरी घेऊन जाऊन घरात कोणीही नसताना घराचा दरवाजा बंद करून तिस चॉकलेट खाण्यास दिले. त्यानंतर बेडरूमधील बेडवर झोपण्यास सांगून तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण तपासिक अधिकारी स.पो.नि गणेश वडणे यांनी आरोपीत हा गुन्हा घडल्यापासून आपल्या राहते घरातून पळून गेला होता. आरोपीत त्याचेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि गणेश वडणे व पथकातील पोहवा एस. एन. नाईकरे, पो.हवा एस. एच.जमादार, पोना सचिन कांगुणे, पो.शि एस. एम. मिसाळ यांनी तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने व गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने दिलीप भाऊ धुरी (५९, रा., श्रीगणेश अपार्टमेंट, रागाई मंदिराचे जवळ, गणेशनगर, डोंबिवली प.) याला मोठागावच्या खाडीजवळ येथे अटक केली.  

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!