ठाणे

कल्याण पंचायत समिती उपसभापती निवडणुक बिनविरोध !

  कल्याण (संजय कांबळे) – कल्याण पंचायत समिती उपसभापती पदाची निवडणूक कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आजपार पडली. या निवडणुकीत शिवसेना पंचायत समिती पिपंरी गणातील सदस्य भरत काळू भोईर  यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने व भाजपाने उमेदवारी अर्ज न भरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे महाविकास आघाडी चे उपसभापती असल्याचे सांगण्यात येत होते.

कल्याण पंचायत समिती च्या सभागृहात आज उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय आधिकारी  कल्याण तहसीलदार विजय पाटील  यांनी भरत भोईर यांचा एकमेव आलेला अर्ज वैध ठरविला दुसरा कोणत्याही सदस्यांचा अर्ज प्राप्त न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.   
दरम्यान मागील  उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने भरत भोईर यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज त्यांनी भरत भोईर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही .   

भाजपा   ५, शिवसेना ४आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३, सद्स्य असे पक्षीय बलाबल कल्याण पंचायत समिती मध्ये  असुन शिवसेनेच्या अनिता वाकचौरे या सभापती पदी विराजमान असुन दोन वेळा हलकावुणी दिलेले उपसभापती पद शिवसेनेने आपल्याकडे खेचुन घेत भाजपाला सत्तेपासुन दूर ठेवत महाविकास आघाडीचा पर्टन् राबिविला आहे.   

कल्याण तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे भरत भोईर यांनी कल्याणचे तहसीलदार विजय पाटील यांच्याकडे अर्ज सादर केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे पदाधिकारी  अरविंद मोरे, माजी सभापती रमेश म्हात्रे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सचिव अभिजित दरेकर,   राष्ट्रवादी काँग्रेसचे, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!