ठाणे

ठाणे जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणेदि.16 :  ठाणे व पालघर जिल्हयातील  सर्व तालुका न्यायालये,कौटुंबिक, कामगार, सहकार व इतर न्यायालयांमध्ये  जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष  ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  दि. 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा  वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये  दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, १३८ एन. आय.अॅक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटर अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे  इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. सर्व पक्षकारांनी  या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

            तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा . तसेच राष्ट्रीय लोकअदालतीबाबत कोणतीही समस्या असेल व कोणतीही चौकशी करायची असल्यास खालील नंबरवर  संपर्क साधावा .

 वाशी नवी मुंबई जिल्हा ठाणे – ०२२-२७५८००८२, भिवंडी – ०२५२२-२५०८२८, कल्याण -०२५१-२२०५७७०, मुरबाड – ०२५२४-२२२४३३, शहापूर – ०२५२७- २०७०७७६, उहासनगर – ०२५१-२५६०३८८, पालघर- ०२५२५-२५६७५४, वसई -०२५०- २३२५४८५,वाडा-०२५२६-२७२६७२, डहाणू -०२५२८-२२२१६० ,जव्हार ०२५२०-२२२५६५.

     अधिक माहितीसाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण , सेवा सदन पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर ठाणे,येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५४७६४४१ यावर संपर्क साधावा.सर्व प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव  एम.आर देशपांडे यांनी केले आहे.   

About the author

Aapale Shahar News

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!