ठाणे

जनआक्रोश मोर्च्यात भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांनी गायला सरकार विरोधात निषेधात्मक पोवाडा…

     डोंबिवली ( शंकर जाधव ): शिवसेना –राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडी सरकार बनवून दोन वर्ष पूर्ण झाली आहे.मात्र या तिन्ही पक्षात सत्तेच्या वाट्यासाठी भांडणे सुरु झाली आहे,राज्यात सार्वजनिक सेवा सुविधांचा पुरता बट्याबोल उडला आहे. आरोग्य व्यवस्था दयनीय झाली आहे,एसटीसारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली, वीज बिलात भरमसाठ वाढ, रस्त्यांची दुरावस्था या सर्वाला हे सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  महाविकास आघाडी सरकारला याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी  डोंबिवलीत भाजपा जनआक्रोश मोर्चा काढला.

      जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक राजन आभाळे, राहुल दामले, मंदार टावरे, नंदू जोशी, विशू पेडणेकर,मंदार हळबे,निलेश म्हात्रे , माजी नगरसेविका विद्या म्हात्रे, खुशबु चौधरी, पूनम पाटील, मयुरेश शिर्के, कृष्णा पाटील, कृष्णा परुळेकर, मितेश पेणकर, मिहीर देसाई , प्रकाश पवार, मनीषा राणे, मनीषा छल्लारे, सुरेखा पांडे,संजीव बिरवाडकर, यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर ते डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला.या मोर्च्याचे नेतुत्व आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले तर मोर्च्यात पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्यात आमदार चव्हाण यांनी इंदिरा चौकात महाविकास आघाडी विरोधात जोरदार भाषण करत हे सरकार जनतेच्या हिताचे नाही असे जाहीरपणे सांगितले.

तर मोर्च्यानंतर  भाजप कार्यकर्ते कोचरेकर व महिला कार्यकर्त्या धरती गाडा, वर्षा परमार, अग्रवाल  यांनी इंदिरा चौकातील प्लास्टिक बाटल्या उचलून जमा करत त्या पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांकडे दिले.आपले शहर स्वच्छ आणि सूंदर राहावे हा मागील उद्देश असल्याचे यावेळी परमार यांनी सांगितले.यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.डोंबिवली शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत  स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत जन आक्रोश  मोर्चात  भाजप आमदारांसह कार्यकर्त्यांनी निषेधात्मक पोवाडा गात सत्ताधारी शिवसेनेसह व महाविकासआघाडी चा निषेध व्यक्त केला. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि दुसरीकडे भरमसाठ वीज बिलाद्वारे नागरिकाची केली जाणारी फसवणूक, वीज माफीचे आश्वासन, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा रुग्णांना न मिळालेला लाभ, मुख्यमंत्री सहायता निधीची न संपलेली प्रतीक्षा, आरोग्य विभाग भरतीत घोटाळा, निकृष्ट दर्जाचे रस्ते, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक जुन्या इमारतीचा रखडलेला पुर्नविकास, अमृत योजनेचा बट्याबोळ, रखडलेला मलनिस्सारन प्रकल्प, रखडलेली बीएसयुपी योजना, स्मशानभूमीची दुरवस्था, धूर, एमएमआरडीएचे रखडलेले रस्ते, घनकचरा उपविधी कराचा बोजा,ठाकुर्ली पुलाचे रखडलेले काम, रुग्णालयातील डॉक्टराची कमतरता, यासह २७ गावातील पाणी, मालमत्ता कर, कामगाराचा प्रश्न, दुहेरी कर आकारणी वाहतूक कोंडी यासारख्या प्रश्नाचा त्रास नागरिकांना होत असून हे प्रश्न सोडविण्यासाठी वांरवार विनंती करत मोर्चा काढत आणि निवेदने देण्यात आली . मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने असा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले .यावेळी बोलताना आमदार चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा अजेंडा मिशन डोंबिवली नसून कमिशन डोंबिवली असल्याचा आरोप केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!