ठाणे, ता 18 नोव्हे (संतोष पडवळ) :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक मा.श्री श्री संजय जी भोकरे पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे, प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वासराव आरोटे, वृत्तवाहीनी प्रमुख श्री रणधीर कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री.राकेश टोळे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने आणि कोकण विभाग व ठाणे शहर अध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांच्या सौजन्याने मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष श्री.शशिकांत नाईक सर क्रिकेट प्रशिक्षण च्या 52 वर्धापनदिनानिमित्त मनोहर स्मृती चषक – भव्य क्रिकेट सामने व गुणगौरव समारंभ ठाणे सेंट्रल मैदान येथे भरविण्यात आला असून प्रमुख पाहुणे श्री. राजेश मढवी – अध्यक्ष स्पोर्टींग क्लब कमिटी सेंट्रल मैदान ठाणे, श्री. उदय परमार – अद्योजक ठाणे, श्री. विलास गोडबोले – रणजी करंडक स्पर्धक, श्री. मुकुंद सातघरे – रणजी करंडक स्पर्धक, श्री. कौस्तुभ पवार – मुंबई रणजी ट्रॉफी, श्री. विद्याधर कामत – रेल्वे रणजी ट्रॉफी आदी मान्यवर उपस्थित होते.सामन्याचे उद्घाटन श्री राजेश मढवी (अध्यक्ष स्पोर्टिंग क्लब कमिटी सेंटर मैदान ठाणे) यांच्या हस्ते झाले असून *”क्रिकेट परिक्षक श्री. शशिकांत नाईक सर 53 वर्षे सराव करून घेत अनेक खेळाडू यांना घडविले आहे हेच त्यांचे क्रिकेट क्षेत्रातील कार्य महान आहे”
त्यावेळी स्पोर्टिंग क्लब कमिटी अध्यक्ष राजेश मढवी बोलत होते सर्व क्रीकेट स्पर्धक संघाचे मनोबल वाढवण्याकरीता श्री. विलास गोडबोले – रणजी करंडक स्पर्धक,यांच्याकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ते बोलत होते की “महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नितिन शिंदे यांचे मी अभिनंदन करतो की पत्रकार संघातर्फे अश्या स्पर्धा घेऊन सामने भरविले जातात . यामधून खेळांडूना प्रोत्साहीत केले जाते या सामन्याचे औचित्य म्हणजे क्रिकेट प्रशिक्षक शशिकांत नाईक सर यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाला 52 वर्षे पुर्ण झाले असून सरांनी अनेक क्रिकेट वीर घडविले आहेत” शशीकांत नाईक सर हे माझे गुरू आहेत ते चांगले प्रशिक्षक आहेत त्यांनी अनेक खेळाडू यांना घडविले आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अशेच अनेक कार्यक्रम घेऊन खेळाडूना मार्गदर्शन करणे- श्री. विद्याधर कामत – रेल्वे रणजी ट्रॉफी श्री. कौस्तुभ पवार – मुंबई रणजी ट्रॉफी,” यावेळी सहभागी क्रिकेट संघामध्ये युथ क्रिकेट संघाने विजेते पदाचा बहुमान पटकावला, व्दीतीय सन्मान सारगावकर ११ संघाने मिळवला, तृतीय सन्मान इंडस अॅकॅडमी संघाने मिळवला तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक मॉर्निंग क्रिकेट क्लब यांनी मिळवले.विजेत्यांचा गुणगौरव आणि पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वमान्यवरांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आभार मानले.